मुख्यमंत्र्यांच्या घरातील हे फोटो बरंच काही सांगून जातात ; अजूनही….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । महाराष्ट्रात अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (cm eknath shinde) विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thackery) कमालीचे संतापले आहे. पण, एकनाथ शिंदे आजही आम्ही शिवसेनेतच आहोत, असं वारंवार सांगत आहे. आज त्याचा प्रत्यय शिंदे यांच्या घरात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळला आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आले होते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या घरात आजही मोठ्या श्रद्धेनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो अजूनही तसाच आहे. कोणत्याही शिवसैनिकाच्या घरात गेल्यावर हे दृश्य नेहमीचेच आहे, याला एकनाथ शिंदे सुद्धा अपवाद ठरले नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला (pandharpur ashadhi ekadashi 2022) विठ्ठल रखुमाईची (vitthal rukmini mahapuja) महापूजा पार पडणार आहे. विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवून समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पूजेचं निमंत्रण दिलं आहे. १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *