महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । सलमान मुल्ला । उस्मानाबाद । पारंपारिक प्रथेप्रमाणे आई तुळजाभवानीचा सकाळी व संध्याकाळी असा दोनदा अभिषेक होत असतो.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षांपासून यात खंड पडला होता. आता परिस्थिती निवळत असताना भाविकांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि पुजारी बांधवांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर अभिषेक सुरू होण्यासाठी सर्वच जण प्रयत्नशील होते..
या अनुषंगाने मंदिर संस्थानने निर्णय घेतला असून दिनांक ७ जुलै पासून सायंकाळी ०७:०० ते ०९:०० या वेळेत अभिषेक पूजा सुरू करण्यात येईल. तसेच दुपारी ०३:०० वाजल्यापासून भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे देण्यात आली आहे.