कोयना धरणात दिवसात 2.68 टीएमसी पाणी वाढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । कोयना धरणाअंतर्गत विभागात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठय़ात अपेक्षित वाढ सुरू आहे. कोयना धरणात सध्या सरासरी 30,888 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील 24 तासांत 2.68 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाणीउंचीत सहा फूट तीन इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण 21.72 टीएमसी इतका पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा 16.72 टीएमसी इतका आहे.

कोयना धरणाअंतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते गुरुवारी सायंकाळी पाच या 24 तासांतील व 1 जूनपासून आत्तापर्यंतचा एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे ः कोयना 110 मि.मी. (834 मि.मी.), नवजा 175 (1108) व महाबळेश्वर 157 (1062) इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

धरणाची एकूण स्थिती लक्षात घेता, एकूण पाणीसाठा 21.72 टीएमसी असून, उपयुक्त पाणीसाठा 16.72 टीएमसी आहे. पाणीउंची 2059.4 फूट , जलपातळी 627.685 मीटर इतकी झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *