सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ऑक्टोपस पाहिला आहे का?; Watch Video

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । रंग बदलणारा प्राणी म्हटलं की आपल्यासमोर सरडाच येतो. सरडा रंग बदलतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ठिकाणानुसार आपल्या बचावासाठी सरडा रंग बदलतो. पण कधी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ऑक्टोपस पाहिला आहे का? (Octopus changed colour) रंग बदलणारा ऑक्टोपस कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. निसर्गाचा हा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल.

ऑक्टोपसचे बरेच व्हिडीओ (Octopus video) तुम्ही पाहिले असतील. पण असा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. त्यामुळे हा व्हिडीओ पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. व्हिडीओत पाहू शकता जिथं जिथं हा ऑक्टोपस जातो तिथं तिथं त्या ठिकाणानुसार तो आपला रंग बदलो. शेवटी तो एका खडकाजवळ जातो आणि त्या खडकाप्रमाणेच होतो.

 

@wonderofscience ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. अवघ्या 20 सेकंदात ऑक्टोपस किती तरी रंग बदलतो. फक्त रंगच नव्हे तर त्याचं रूपही बदलताना दिसतं. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. बहुतेकांनी याची तुलना एलियन्सशी केली आहे. हा समुद्रात राहणारा एलियन असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *