![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । सुदीपकुमार देवकर । कळंब । याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील महा इ सेवा केंदाचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामासाठी लागणारे सर्व दस्तावेज कळंब तहसील कार्यालयामध्ये अडकून आहेत.
या संदर्भामध्ये सतपाल भाऊ बनसोडे व सुदीप कुमार देवकर यांनी त्या संदर्भात निवेदन दिले होते पण याच संदर्भामध्ये कोणतेही कारवाई झालेली नसल्यामुळे आणि महा-ई-सेवा केंद्राचे सर्वर डाउन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबत उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर सर्व्हर दुरुस्त होईल व विद्यार्थीना वेळेवर प्रमाणपत्र मिळतील अशी ग्वाही दिली आहे. जर दोन दिवसात महा ई सेवा केंद्राचे सर्व्हर चालू झाले नाही तर आम्ही कळंबकर तीव्र आंदोलन करणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे.