शिवसेनेकडून आणखी एका बंडखोर आमदारावर कारवाईचा बंडगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची प्रभारी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी वाट पकडल्याने शिवसेनेत गळतीच सत्र सुरू झाले आहे. यात शिवसेनेकडूनही बंडखोरांवर कारवाईचा बंडगा उगारल्या जात आहे. यातच शिवसेनेने तानाजी सावंत यांना धक्का देत त्यांचे पद काढून घेतले आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती झाल्याचे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. तर मुख्य म्हणजे कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्याची देखील उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.

खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट म्हणून तानाजी सावंत यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. पुणे जिल्ह्य़ात इंजिनीअिरग, फार्मसी अशा विविध महाविद्यालयासह त्यांचे 3 खासगी साखर कारखानेदेखील आहेत. रियल इस्टेट व्यवसायातही त्यांचा भलामोठा वावर आहे. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश करताच यवतमाळमधून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करत शिवसेनेचे उपनेतेपद दिले हाते. यानतंर हळूहळू त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेवर पकड मजबुत केली होती. मात्र 2019 मध्ये त्यांना मंत्रीपद न दिल्याने त्यांची पक्षाची नाराजी होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखांनी समजूत घातल्यानंतर ते पक्षात सक्रिय झाले होते. ​​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *