महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राज्यात एकीकडे राजकारण तर दुसरीकडे पाऊस, करोना आणि नैसर्गित संकट यामुळे सामन्य जनता भरडत चालली आहे. अशात ऐन महागाईत नागरिकांना आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. कारण, महावितरणने इंधन समायोजन शुल्कात (एफएसी) वाढ केल्याने महागाईचा सामना करणाऱ्या वीज ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
महावितरणच्या इंधन दरवाढीमागे एफएसी वाढवण्याला निर्णयाला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) मान्यता दिली आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार, १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट १० पैशांऐवजी ६५ पैसे, ३०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी २० पैशांऐवजी १ रुपये ४५ पैसे, ५०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी प्रति युनिट २५ पैशांऐवजी २ रुपये. ५ पैशांपेक्षा जास्त आणि ५०० युनिट्सच्या वापरासाठी २५ पैशांऐवजी २ रुपये ३५ पैसे शुल्क आकारलं जाणार आहे.
यामुळे आता जर तुम्हाला ५०० रुपये बिल येत असेल तर ते वाढून तुम्हाला ५८० रुपये बिल येईल. १ हजार रुपये बिल येत असेल तर ते वाढून आता १ हजार २०० होईल आणि जर तुम्हाला १ हजार ५०० बिल येत असेल तर ते वाढून हजार ७०० होईल. म्हणजेच तुमच्या बिलामध्ये १५ ते १६ टक्के वाढ होणार असून ही सामान्यांच्या खिशाला कात्री आहे.