महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । शिवसेना आणि शिंदे गटाचा वादावर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) सुनावणीसाठी नकार दिला असून निर्णय जैसे थेच ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर,’ न्यायालयाने काय निकाल दिला आहे, अद्याप तो वाचला नाही, त्यामुळे यावर आताच बोलता येणार नाही’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
‘ शिंदे गटातील 16 आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज सुनावणी झाली आहे पण मी न्यायालयाचा निकाल वाचला नाही. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर बोलणं योग्य राहणार नाही ‘ असं म्हणत शरद पवार यांनी न्यायालयाच्या निकालावर बोलणे टाळले आहे.