महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. रक्षाबंधन आहे. गणपती आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही. ग्राहक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करतात. त्यामुळे मागणी कायम राहील. त्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार नाही.
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,७८० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,५८० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचा दर ५४,५०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ४०० रुपयांची घट झाली आहे.