महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना वाचावण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभे राहिले आहे. अशाच आता जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेना ताब्यात घेण्याची एकनाथ शिंदे यांची राक्षशी महत्त्वाकांशा असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष वाढत चालला आहे. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जातो आहे. तर उद्धव ठाकरे यांनी ही एकनाथ शिंदे यांची राक्षसी महत्वकांशा असून शिवसेना गिंळकृत करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. ही लढाई आता न्यायालयापर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीनंतर स्मिता ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना, आपण मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली असल्याचे सांगितेल. तसेच शिवसेनेला पुढे नेण्यात सीएम शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचे देखील त्या म्हणाल्या.