महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । या वर्षी टॅक्स ऑडिट लागु नसलेले आयटी रिटर्न फाईल करण्याच्या शेवटच्या दिवशी रविवार आला आहे. त्यामुळे आयटी रिटर्न्स फाईल करण्याच्या शेवटच्या दिवशी बँका बंद राहतील, परिणामी आय. टी. रिटर्न भरणार्याची गैरसोय होणार आहे.सदर गैरसोय होवू नये म्हणून बँकांनी 31 जुलैला म्हणजे रविवारी आपली नेट बॅंकिंग फॅसिलिटी सुरळीतपणे चालू ठेवावी जेणेकरून आपापल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही अशी अपेक्षा आहे……पी. के. महाजन….जेष्ठ कर सल्लागार.