केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता स्थगित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्के वाढवण्याच्या प्रस्तावाला मार्चमध्ये मंजुरी दिली होती. पण आता ही वाढ स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूलही घटला आहे. या संकटाच्या परिस्थितीत गरीब आणि गरजुंना सरकार अन्नधान्यसह आवश्यक सुविधा सरकारला पुरवाव्या लागत असल्याने खर्चाचा ताण सरकारवर आला आहे.

आर्थिक ताणामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने स्थगित केला आहे. केंद्रीय कॅबिनेटची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्त्याची वाढ पुढील वर्षभरासाठी स्थगित ठेवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाईल.

महागाई भत्ता वाढ स्थगित केल्यास त्याचा परिणाम ४९.२६ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. यासोबतच ६१.१७ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शनवरही होईल.

वाढती महागाई पाहून वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येतो. आता येत्या जुलैमध्ये यावर पुन्हा केंद्रकडून विचार केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *