गाडी फोडणे सोडा, माझ्या…… तर आमदारकीचा राजीनामा देईन ; या बंडखोर आमदाराचे शिवसेनेला आव्हान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. हा वाद आता मतदारसंघातपर्यंत पोहचला आहे. हिंगोलीत शिवसेना व शिंदे गट यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता पेटायला सुरुवात झाली आहे. हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांच्या गाड्या फोडा असे आवाहन आज शिवसैनिकांना केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी उत्तर दिलं आहे.

शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी माझी गाडी फोडणे सोडा, तुमच्या घरापुढे गाडी आणतो गाडीच्या काचाला हात लावून दाखवला तरी आमदारकीचा राजीनामा देईन असे मांडी ठोकत प्रतिआव्हान शिवसेनेला केले आहे. याचबरोबर आमदार बांगर यांनी शिवसेनेत पदे मिळवण्यासाठी वसुली होते, मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात असा धक्कादायक आरोप व खुलासा केला आहे. संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाला एक हजार लोकांच्या जेवणाचा खर्च, क्रिकेट सामन्याच्या इनामासाठी एक लाख रुपये व खासदार विनायक राऊत यांना भेट म्हणून गळ्यातील सोन्याची साखळी माझ्याकडून दिली आहे, असा धक्कादायक आरोप बांगर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *