राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर, याआधी त्यांच्यावर दोनदा झाली अँजिओप्लास्टी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती (Health Update) सध्या स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत दररोज ताजे अपडेट्स समोर येत आहेत. राजू सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते गेल्या 5 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनाही त्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. राजू यांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरात आधीसुद्धा 9 स्टेंट टाकण्यात आले आहेत. यापूर्वी दोनदा अँजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होण्याची ही तिसरी वेळ आहे.

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली पडले. सध्या ते एम्सच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *