महाराष्ट्र 24 । नांदेड । प्रतिनिधी । संजीवकुमार गायकवाड । लॉकडाऊनच्या पूर्वी नांदेड येथील पवित्र श्री.सचखंड हुजूरसाहेब गुरुव्दाराच्या दर्शनासाठी पंजाब राज्यातुन आलेले3500भाविक कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे नांदेड येथे अडकले होते त्याना त्याच्या राज्यात जाण्यासाठी परवानगी ची आवश्यकता होती. मा. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंत्रीमंडळच्या अर्थविषयक सल्लागार उपसमितीच्या बेठकीत शीख भाविकांच्या विषय आग्रहाने मांडला होता तसे त्यानी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे याच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॉप्टन अमरीदरसिंग यांच्याशी चर्चा करून तशी परवानगी दिली.
हिंगोलीयेथील खुराणा ट्रॅव्हल्सचे मालक जगदीश खुराणा यांनी ना नफा ना तोटा या तत्वानुसार सर्व भाविकांना पंजाब येथे नेऊन सोडण्याची तयारी दाखवली त्या नुसार गुरुवारी 8वाजता गुरुद्वाचे मुख्य जत्थेदार बाबा कुलवंतसिंघजी यांनी सर्व भाविकांचे अरादास केली व सर्वाना शिरोपा प्रदान केला व नंतर हा जत्था पंजाब कडे रवाना झाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिनदरसिंग यांनी मा. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे फोन करून आभार मानले. यावेळी बाबा कुलवंतसिंघजी आ. अमरभाऊ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्र बुंगई, सदस्य मनप्रीतसिंघ कुंजीवाले, गुरुमितसिंघ महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा आदी उपस्थित होते.