महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाउन जाहीर केला असून संचारबंदी लागू आहे. तरीही आरोपींनी वहिनीसाहेब कॉलनीतील एका मटणाच्या दुकानाबाहेर मटण घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतानाही गर्दी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मटण घेण्यासाठी गर्दी केल्याने वाकड पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई थेरगाव येथे करण्यात आली.
अब्दुल हमीद कुरेशी (वय 49), नुर गुलजार खान (वय 21), जावेद हाजी शेख (वय 32), मोहंमद शमीम शेख (वय 40), सलीम अब्दुलखालीद अन्सारी (वय 36), आझम दाऊद कुरेशी (वय 30), अजीज हाजी शेख (वय 30, सर्व रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.