महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ऑगस्ट । बांधकाम व्यावसायिकांना गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंटची नोंदणी बंधनकारक असतानाही याकडे मात्र कोणीच लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यभरात केवळ १ लाख ६,४९६ गृहनिर्माण संस्थांचीच सहकार विभागाकडे नोंदणी झाली आहे. लाखो रुपये खर्च करून ग्राहकांना केवळ फ्लॅटचीच मालकी मिळत असून इमारतीची मूळ जागा मात्र बिल्डरच्याच मालकीची राहत आहे.
राज्यभरात १ कोटींवर गृहनिर्माण संस्था आहेत. बहुतांश फ्लॅटमालक गृहनिर्माण संस्था नोंदणी कायद्यापासून अनभिज्ञ आहेत. सोसायटी स्थापन न झाल्यामुळे कित्येकदा फ्लॅटधारक व विकासकांत वाद होतात. जागा नोंदणीसाठी सहकार विभागाच्या शासकीय परिपत्रकाकडेही दुर्लक्ष होत आहे. बिल्डर आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी नोंदणीसाठी उत्सुक नसल्याचीही तक्रार फ्लॅटधारकांकडून करण्यात आली आहे.
नोंदणीबाबत कायदा काय सांगतो
फ्लॅटधारकाला फ्लॅटसह मूळ जागेच्या सातबारा उताऱ्यावर नाव लागण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट १९६३ कायदा आहे. कलम १० व १९६४ चे कलम ८ नुसार, फ्लॅटचा ताबा घेतल्यापासून फ्लॅटधारकांनी ४ महिन्यांत सोसायटी नोंदणीचा अर्ज करणे बंधनकारक आहे. बांधकाम पूर्ण व १० गाळे विकल्यावर बिल्डरने सोसायटी स्थापून तिची नोंदणी करणे, नोंदणीच्या तारखेपासून ४ महिन्यांत ती इमारत सोसायटीच्या नावावर व विशिष्ट तुकड्याची मालकी करावी.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रकार
बंगल्याची सोसायटी, स्वतंत्र मालकीचे प्लॉट असलेली सोसायटी, खरेदी प्लॉट सभासदांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेवर बांधलेली सोसायटी, संस्थेने स्वत: सभासदांसाठी बांधलेले बंगले वा सोसायटी
मुंबईत सर्वाधिक, गडचिरोलीत सर्वात कमी नोंदणी
विभाग – नोंदणी
मुंबई विभाग- 32598
कोकण विभाग – 36809
नाशिक विभाग – 3748
पुणे विभाग – 19733
कोल्हापूर विभाग – 1042
औरंगाबाद विभाग 1154
लातूर विभाग 489
अमरावती विभाग 584
नागपूर विभाग 831
एकूण 96988