अमेरिकेतील मृत्यूची संख्या 53 हजार 511 वर पोहचली

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : जगभरात सर्वत्र फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. मागील चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल 2 हजार 494 जाणांचा करोनाने बळी घेतला आहे. यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण 53 हजार 511 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल नऊ लाख 36 हजार 293 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोविड १९ म्हणजे करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड १९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *