मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॉफिक ब्लॉक ; पहा कशी होणार पर्यायी वाहतूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती (Mumbai Pune Express Way) ट्रॅफिक कोंडी असणं हे काही नवीन नाही. या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना देखील या ट्रॅफिकची (Traffic Jams) आता सवय झाली आहे. शिवाय या मार्गावर सततच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या अनेक नागरिकांनी या वाहतीक कोंडीवर काहीतरी तोडगा काढावा अशी अनेक वेळा मागणी देखील केली आहे.

ट्रॅफिक आणि रहदारीमुळे या महामार्गावर अनेक अपघात देखील होतात मात्र, या एक्स्प्रेस वेवरील अपघातांची दखल घेतली गेली ती, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मेटे यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारकडे महामार्गावरील अपुऱ्या सुविधांवरती ठोस उपाययोजना कराव्या अशी इच्छा बोलून दाखवली. याच सर्व पार्श्वभूमीवर आता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS (इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत असून यासाठीच आज शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हर हेड ग्रँटी बसविन्यासाठी एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ ते २ या दरम्यान किवळे ते सोमाटणे दरम्यान ब्लॉक घेतला जाणारे आहे.

आज अशी होणार वाहतूक –

या दोन तासासाठी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. त्यामुळे या २ तासांमध्ये किवळे ते सोमाटणे मार्गावरुन वाहनधारकांना जाता येणार नाही. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या (MSRDC) वतीने करण्यात आले आहे.

एमएसआरडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून तसेच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *