पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-रुपीनगर परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-रुपीनगर परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे. आज (सोमवारी) दोन पुरुष आणि एका महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुपीनगर परिसरात आजपर्यंत 15 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 60 वर पोहचला आहे. आजपर्यंत 88 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 28 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने रविवारी (दि. 26) 116 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज आले आहेत. त्यामध्ये रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या 28, 26 वर्षीय दोन पुरुषांचे आणि 25 वर्षाच्या एक महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हायरिस्क कॉन्टॅक्टमधून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रुपीनगर परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरू लागला आहे. दरम्यान, 24 एप्रिल रोजी एकचदिवशी रुपीनगर परिसरातील तब्बल 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. 23 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधून 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आजपर्यंत या परिसरातील 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.नाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *