वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो ; दसरा मेळाव्याचा वादात आता मनसेची उडी ; राज ठाकरे घेणार का मेळावा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । शिवसेनेमध्ये (shivsena) दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेनेनं दसरा मेळावा (shivsena dasara melava 2022) होणारच असा दावा केला आहे. तर दुसरीकडे, मनसे सुद्धा या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे(sandeep deshpande) यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच दसरा मेळावा घ्यावा, अशी विनंती केली आहे.

मुंबईतील दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थावर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जात असतो. पण, यावेळी शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद सुरू असताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उडी घेतली आहे.
संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी राज ठाकरे यांची भेट घेवून दसरा मेळावा घेण्याची विनंती करणार आहे.

‘दसऱ्याला विचारांचे सोनं लुटण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि ते सोनं बाळासाहेब ठाकरे वर्षानूवर्ष लुटत आले आहेत. त्यामुळे वारसा हा वास्तूचा नसून विचारांचा असतो हे राज ठाकरेंचे वाक्य ट्विटकरून संदीप देशपांडे यांनी तसे संकेतही दिले आहे. मात्र, राज ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहण्याचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे आणि तो शिवतीर्थावर होणार आहे, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *