महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । आज भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आपण राज यांची केवळ सदिच्चा भेट घेतली असून, उद्यापासून गणेशोत्सवदेखील आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट सदिच्छा भेट होती यामध्ये कोणतेही राजकीय समीकरण नाही असे, स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. राज आणि आमचे वैचारीक साम्यदेखील आहे. वैचारिक युती होणार का? प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहेत. तसेच रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं गैर नाही.
मनसे युतीचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस आदी घेतात. त्यामुळे मनसे युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच घेतला जाईल असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. माझं, काम केवळ पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. त्यामुळे युती करणे भविष्यात काय रणनीती असेल याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील.