पुन्हा एकदा समोरासमोर येणार भारत-पाकिस्तान ? वाचा कधी होणार ‘महामुकाबला’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । आशिया कपचे वेळापत्रक समोर येताच भारत आणि पाकिस्तान एकापेक्षा जास्त वेळा आमनेसामने येऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये भारताने पाच विकेट्सने बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा या दोन्ही संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास अंतिम सामनाही भारत आणि पाकिस्तान यांच्यातच होऊ शकतो. पण हे सर्व कसे शक्य आहे? चला जाणून घेऊया.

आज शारजाहमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अ गटातील शेवटचा सामना आहे. यासह सुपर ४ चा अंतिम संघही निश्चित होणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो सुपर ४ मध्ये स्थान मिळवेल, जिथे भारत याआधीच सलग दोन विजयांसह पोहोचला आहे. सुपर ४ मधील त्या संघाचा पहिला सामना रविवारी भारतासोबत होणार आहे. जर अनपेक्षित निकाल नाही लागला तर सुपर ४ मध्ये पाकिस्तानचे स्थान निश्चित मानले जात आहे. भारत पाकिस्तान सामना रविवारी रंगला तर क्रिकेट चाहत्यांसाठी हा रविवार सुपर संडे ठरू शकतो. सायंकाळी साडेसातपासून हा सामना खेळवला जाणार आहे.

सुपर ४ मध्ये पोहोचणारे सर्व संघ किमान तीन सामने खेळतील आणि जर भारत-पाकिस्तान टॉप २ संघ बनले तर क्रिकेट जगताला आणखी एक चुरशीचा सामना पाहण्याची संधी मिळेल. सध्या आशियातील अंतिम सामना हा टी २० विश्वचषकातील बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील ड्रेस रिहर्सल मानला जाऊ शकतो. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

पाकिस्तान हाँगकोन्गला सहज हरवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही संघ टी-२० फॉरमॅटमध्ये प्रथमच आमनेसामने येणार आहेत. याआधी वनडे सामन्यांमध्ये या दोन्ही स्नघांची लढत झाली आहे. तिन्ही वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे. त्यामुळे पाकिस्तानला यावेळेस देखील हाँगकोन्गला हरवण्यात काहीच हरकत नसावी.

 

पाकिस्तान संभाव्य अंतिम अकरा :
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, हरिस रौफ, शाहनवाज दहनी

हाँगकाँग संभाव्य अंतिम अकरा:
निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, झीशान अली, स्कॉट मॅकेची, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *