प्रगतीची सर्व इंजिन व डबे ……. ; सामनाच्या अग्रलेखातून सूचक इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राजकीय वादंग पेटला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावण्यात आलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. “मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, असा सूचक इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

‘सामना’च्या अग्रलेखात काय म्हटलंय?

मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे. वेदांता – फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंटं उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय

शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात हा विचार केला पाहिजे की, जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते? पण माणसं एकदा बेइमानीच्या उताराला लागली की त्यांना सावरणे कठीण असते. मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी त्याच बेइमानीच्या उताराला लागली आहे. त्यांचा अधःपात आता अटळ आहे, असा इशाराही ‘सामना’च्या अग्रलेखात देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *