Horoscope Today : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर ।

मेष (Aries ):-
आज योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल.

वृषभ (Taurus):-
आज जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल.

मिथुन (Gemini ):-
आज घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल. कुटुंबासोबत दिवस मजेत जाईल.

कर्क (Cancer):-
आज घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल.

सिंह (Leo ):-
आज लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा.

कन्या (Virgo):-
आज दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल.

तूळ (Libra ):-
आज कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. विनाकारण धावपळ वाढेल.

वृश्चिक (Scorpio):-
आज शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू (Sagittarius):-
आज मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल.

मकर (Capricorn):-
आज आपले मत योग्य प्रकारे पट‍वून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्‍यांना नाराज करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. अनावश्यक खर्च टाळावेत.

कुंभ (Aquarius ):-
आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत.

मीन (Pisces):-
आज अतिविचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल. जोडीदाराच्या साथीने समोरील प्रश्न सोडवाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *