Vinayak Raut vs Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना विनायक राऊतांची जीभ घसरली तर फडणवीसांचे केले कौतुक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर । शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर शिवसेना नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा कोणताही बंडखोर आमदार किवा खासदार असो त्यांच्यावर शिवसेना नेते जहरी टीका करताना दिसत आहेत. दरम्यान कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी तर थेट एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. (Vinayak Raut vs Eknath Shinde) याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले आहे. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात राऊत बोलत होते.

विनायक राऊ यांनी जोरदार टीका करत म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या ##### करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा या मुख्यमंत्री शिंदेंचा असल्याचे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागणार असल्याचे म्हणाले.

राज्यात मोठ्या रोजगाराची कंपनी वेदांता येणार होती परंतु ही कंपनी गुजरातला पाठवण्याचे काम शिंदे सरकारने केला आहे. दरम्यान विनायक राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हणाले कि, फडणवीसांसारखा अत्यंत हुशार माणूस अडाण्यासोबत काम करत आहे. फडणवीसांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे हे त्यांचे दुर्दैव आहे. शिंदेच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की फडणवीसांना आल्याची टीका राऊतांनी यावेळी केली. भगवान के पास देर है, लेकिन अंधेर नही है, असा म्हणत विनायक राऊत यांनी फडणवीसांना टोला हाणला.

किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलंय. 40 आमदार, 12 खासदार गेले तरीही घाबरू नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना पेटून उठण्यास सांगितलं. बंडखोरांविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीही सज्ज राहण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

गद्दारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम मागाठाणे येथून केले जाणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली. गद्दारांना गाडण्याचा दिवस आला आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय. यावेळी शिवराळ भाषेत केलेल्या टीकेमुळे विनायक राऊत चर्चेत आलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *