Gold-Silver Price : आज सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ कि घट ; जाणून घ्या आजचा भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर । Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४५,९५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,९५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,९८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,१६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६४ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *