“ महाराष्ट्राला मनोरंजनापासून वंचित ठेवू नये , सेनेच्या ‘टोमणे मेळाव्या’ला मनपाने परवानगी द्यावी ”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० सप्टेंबर । मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. ‘टोमणे मेळावा’ म्हणत त्यांनी शिवेसनेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे. “मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर ‘टोमणे मेळावा’साठी परवानगी देवून टाकावी. खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये.तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरूनच येणार आहे. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *