महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ; सलमान मुल्ला । दि . २४ सप्टेंबर । कळंब:-तालुक्यात सध्या खरीप हंगाम बहरात आला आहे. दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी होऊन त्यांची नोंद सातबारावरील नमुना नंबर १२ वर येत असते. या वर्षी मात्र नोंदीसाठी ‘ई पीक पाहणी हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात स्वतः शेतकऱ्यांनाच थेट आपल्या शेतातून पिकांची नोंद करावी लागणार आहे.
यासाठी इ पिक पाहणी या ॲपचा वापर करावा लागत आहे.मात्र शेतामधील उभ्या पिकात उभे राहून ऑनलाईन पिकांची माहिती व फोटो अपलोड करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मोबाईल घ्यायची ऐपत नाही, घेतला तर वापरता येत नाही. आणि जरी घेतला तरी मोबाईल व ऍप ला रेंज मिळत नसल्याची व ॲप चालत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये ई-पीक पाहणी करायची कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडे उद्भवला आहे..
*गेल्या तीन ते चार दिवसापासून आम्ही एक पीक पाहणी ॲप द्वारे पिक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु अॅपस चालत नसल्यामुळे आम्हाला पीक नोंदणी करण्यास अडचण येत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ऑफलाइन पीक पाहणी करावी*
*विशाल बबन फल्ले, शेतकरी डिकसळ*