500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता ; RBI करणार मोठा बदल, जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ सप्टेंबर । तुमच्याकडे जर 500 रुपयांच्या नोटा असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयकडून (RBI) हा बदल केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात 500 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या असतील, तर नोटांमध्ये कोणता बदल होईल हे जाणून घेणं गरजेचे आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्या नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली. सरकारनं 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. यानंतर 500 रुपयांच्या नव्या नोटा आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. तेव्हापासून हीच नोट चलनात आहे.

देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे. अशा सूचनेनंतरच नवीन प्रकारच्या नोटा जारी केल्या जाऊ शकतात. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने नोटेमधील स्पर्शाशी संबंधित अनेक बदलही केले आहेत, जेणेकरून दृष्टिहीन लोकांना नोट सहज ओळखता येईल. याशिवाय रुपया आणि नाण्यांमध्येही बदल केला जाणार असल्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनंतर रुपया किंवा नाणे बदलून दृष्टिहीनांसाठी योग्य बनविण्याचा प्रयत्न केला जातो.

याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही अलीकडेच MANI Appअपडेट केले आहे. आता तुम्हाला यात 11 भाषांचा सपोर्ट मिळेल. पूर्वी त्यात फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध होती. आता हे App उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसेच हे App पूर्णपणे मोफत असेल.

रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये हे App लाँच केले. अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा उद्देश होता. या App च्या मदतीने कोणतीही व्यक्ती नोट सहज ओळखू शकते. कोणती नोट कोणती व्यक्तीच्या हातात आहे, ते App च्या माध्यमातून आवाजात ऐकू येते. अशा परिस्थितीत, अंध व्यक्तींना त्यांच्याकडे कोणती नोट आहे हे अगदी सहज कळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *