कोथिंबिरीला तब्बल 19 हजार रुपये भाव; शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ सप्टेंबर । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात गुरुवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला १९ हजार शंभर रुपये भाव मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन,दूगाव, धोंडेगाव,सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर येथूनही पालेभाज्यांची आवक होत असते. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले .

साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी युवराज गावित हे कोथिंबीर घेऊन आले होते. त्यांच्या कोथिंबिरीस १९ हजार रुपये शेकडा बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर मनोज परदेशी या व्यापाऱ्याने घेतली असून गुजरात सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *