Dussehra 2022 : दसराच्या मुहूर्तावर सोन्याने गाठली निच्चांकी पातळी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । गेल्या काही वर्षांपासून सोन्याचे भाव गगणाला भिडतात आहे. तरीही सोने खरेदी कमी झाली नाही. लग्न समारंभासाठी सोने खरेदी करण्यात येते. हिंदू धर्मात, प्रत्येक काम आणि कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी शुभ काळ पाहून केले जातात. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य आणि शुभ मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू नेहमी यशस्वी आणि फलदायी असं, अशी मान्यता आहे.

दसऱ्याचा मुहूर्तावर (dussehra 2022) महिलांसाठी आनंदाची बातमी (Good news for women) आहे. सराफा आणि मल्टी कमोडिटी मार्केट (MCX) मध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून आलेल्या अस्थिरतेनंतर सोन्याचा भाव विक्रमी नीचांकी पातळीवर आहे. यासह चांदीची घसरणही सुरूच आहे. मात्र, नवरात्रीच्या काळात सोन्यात किंचित वाढ होते. बुधवारी सकाळी (wednesday), मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX Gold Price) या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली आणि सोने आणि चांदी लाल चिन्हांसह व्यवहार करत आहेत.

सोन्याच्या फ्युचर्सच्या दरात सातत्याने घसरण
बुधवारी, मल्टी-कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या फ्युचर्सचे दर सातत्याने घसरत आहेत. डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 69 रुपयांनी घसरून 49381 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. यापूर्वी मंगळवारी तो 49450 रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 641 रुपयांच्या घसरणीसह 54738 रुपये प्रति किलोवर आहे. मंगळवारी तो 55379 वर बंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *