…… ह्या मुळे झाले बारामती करोनामुक्त : अजित पवार

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – बारामती – विशेष प्रतिनिधी – बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण बरा झालाय. त्याच्यावर पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते. ससुन रुग्णालयातून या रुग्णाला गुरुवारी(दि ३०) डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त शहर झाले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय करोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिलं. “बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं अजित पवार यांनी नमूद केलं. याशिवाय, अशाचप्रकारे महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “करोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो! अशाच पद्धतीनं महाराष्ट्रसुद्धा लवकरच करोनामुक्त होईल, असा मला विश्वास आहे”,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *