जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट ठरली ; हि तोफ धडाडणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. BCCI ने अधिकृत वृत्त दिले नसले तरी PTI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता, बुमराहच्याजागी मोहम्मद सिराजला आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीने यासंदर्भातील घोषणा केली. सिराज सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी सामने खेळत आहे. मात्र, त्याला तेथून भारतात बोलविण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार तो वर्ल्ड कपही खेळणार नाही. सध्या, ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

बुमराहच्या जागी भारतीय संघात राखीव असलेल्या मोहम्मद शमी किंवा दिपक चहर यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, मोहम्मद सिराजचे स्थान निश्चित झाले आहे.

सध्या भारतीय संघ

भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

23 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर – भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर – भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर – भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर – भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
१३ नोव्हेंबरला अंतिम सामना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *