Rain Update: राज्यात आज या ठिकाणी पावसाचा ‘यलो’ अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ ऑक्टोबर । देशासह राज्यात पावसाचा जोर कमी होत आहे. राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. पुणे मुंबईसह ठाणे परिसरात हलक्या सारी बरसल्या. तसेच बीड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, सध्या राज्यात परतीच्या पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झाले असून हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज कोकणातील तिन्ही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता इतर जिल्ह्यातही पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज देखील राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *