महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे चुकीचं आहे. या सर्वांना आता महाराष्ट्रातून जाऊ नये. आज त्यांची महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. संकटकाळात ज्या राज्याने तुम्हाला सर्व काही दिलं त्याला सोडून का जात आहात? महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिले आणि पैसे कमवले. मात्र आता संकट आल्यावर आपल्या राज्यात जाण्याचा विचार करणार. मात्र हे परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यावर त्यांची कामं कोण करणार आहे. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत राज ठाकरे बोलत होते.
मुंबईवर कोरोनाचं संकट आल्यावर परराज्यातून आलेले आता आपल्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येण्यास माझा विरोध नाही. मात्र परप्रांतीय सुरुवातीला मान खाली घालून येतात, नंतर मान वर करुन दादागिरी करतात हे चालणार नाही. नोकरी-धंदा करण्यासाठी येताय त्यांना कुणी विरोध करत नाही. मात्र एवढी वर्षे महाराष्ट्राचे राहत आहात, तर इथले व्हा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं