Shivsena : पक्षचिन्हासोबत आता थेट पक्षाध्यक्षपदावरच एकनाथ शिंदेंचा दावा ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । शिवसेना कोणाची हा वाद सध्या चांगलाच पेटताना दिसत आहे. धनुष्यबाण कोणाचा, पक्ष कोणाचा याबद्दल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचाही लढा सुरू असतानाच आता शिंदेंनी थेट पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावरुन निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदावरही शिंदेंनी दावा सांगितला आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक प्राथमिक सदस्य आपल्या पाठीशी आहेत, असा उल्लेखही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

आज शिवसेनेचं पक्षचिन्ह कोणाचं? ठाकरेंचं की शिंदेंचं यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आजची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज शिवसेना फक्त पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे ही सुनावणी आज होणार नाही. दरम्यान, धनुष्यबाण आम्हाला द्या अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *