पिंपरी चिंचवड शुक्रवारी दिवसभरात एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला नाही ; मागील चार दिवसात 10 जणकोरोनामुक्त होऊन घरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे :- पिंपरी-चिंचवड शहरात 8 ते 30 एप्रिल दरम्यान दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत होते. केवळ 22 दिवसात तब्बल 95 नवीन रुग्णांची भर पडली होती. रुग्ण संख्येची साखळी शुक्रवारी (दि.1) रोजी तुटली. शुक्रवारी दिवसभरात एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. तर, मागील चार दिवसात 10 जणकोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. महापालिकेच्या आठपैकी दोन प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. आज प्रसिद्ध केलेल्या नकाशात संभाजीनगर,मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेला ‘अ’ प्रभाग कोरोनामुक्त झाला आहे. तर, रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसर येतअसलेला ब’ प्रभाग पहिल्यापासून कोरोनामुक्त आहे.दोन दिवसांपुर्वी पुण्यातील गंजपेठेतून एक नागरिकचिंचवड परिसरातील एका नातेवाईकाकडे आतले होते.त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. पण, ते पुण्यातील रहिवासी असल्याने त्यांची नोंद महापालिका प्रशासनाने केली नाही. त्यामुळे ‘ब’ प्रभाग कोरोनामुक्तच राहिला आहे, कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘फ’ प्रभागात सर्वाधिक 30 रुग्ण आहेत.तर, ‘इ’ प्रभाग रेडझोनमधून बाहेर आला असून रुग्ण संख्या कमी झाली आहे. प्रभागात आता 13 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या ! 

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात (दोनही रुग्ण बरे होऊन
घरी आल्याने प्रभाग कोरोनामुक्त झाला आहे.
‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बो्हाडेवाड,धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे केवळ तीन रुग्ण आहेत.
‘इ‘- क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चन्होली, दिघी भागात कोरोनाचे13 रुग्ण आहेत. हा प्रभाग रेडझोनमधून बाहेर आला
आहे.
‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात कोरोनाचे सर्वाधिक 30 रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे.
‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्यापिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे सहा रुग्ण आहेत.
‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,  फुगेवाडी,  कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सहा रुग्ण आहेत.
कोरोनाच्या सक्रिय 68 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहरा बाहेरील ही काही रुग्णांवर महापालिकारुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 123जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 42 जणकोरोनामुक्त झाले आहेत. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *