शिवसेनेचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाविरोधात अखेर दिल्ली कोर्टात धाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑक्टोबर । निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेनं आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. दिल्ली हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.

शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये सिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली.

निवडणूक आयोगानं अंतिरम आदेश पारित केला आहे. आम्ही त्यादृष्टीने चिन्ह दिले आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नैसर्गिक न्यायात बाधा येणार असल्याचं आम्हाला दिसतंय. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. शनिवारी पत्र पाठवले आणि लगेच निर्णय घेतला, असा आरोप अनिल देसाई यांनी केला.

आयोगानं सुनावणी घ्यायला पाहिजे होती, आम्हाला अवधी द्यायला पाहिजे होता. एकतर्फी निर्णय आयोगानं घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं घाईनं निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या. दिल्ली हायकोर्टासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत, अशी माहितीही देसाई यांनी दिली.

पक्षाची घटना , पदाधिकारी सर्व गोष्टी आम्ही नमूद केल्या आहेत. यावर कोर्टात सखोल विचार होईल. फ्री चिन्हात राष्ट्रयत्व संदर्भात आक्षेप नसेल तर चिन्ह दिलं जाऊ शकत त्यामुळे आम्ही त्रिशूळला प्राधान्य दिले आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *