महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ ऑक्टोबर ।
मेष (Aries):-
आज घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल.
वृषभ (Taurus):-
आज काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन (Gemini):-
आज कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. हस्त कलेसाठी वेळ काढावा. दिवस चांगला जाईल.
कर्क (Cancer):-
आज हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
सिंह (Leo):-
आज सल्ला मागणार्यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.
कन्या (Virgo):-
आज कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या. आर्थिक लाभ संभवतो.
तूळ (Libra):-
आज दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील.
वृश्चिक (Scorpio):-
आज लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. परक्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेऊ नका.
धनू (Sagittarius):-
आज हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक भावना वाढीस लागेल.
मकर (Capricorn):-
आज सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील. कमिशन मधून लाभ कमवाल.
कुंभ (Aquarius):-
आज नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या. कुटुंबियांना दुखवू नका.
मीन (Pisces):-
आज विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनातील निराशेला दूर सारा.