Gold- Silver ; आज इतक्या रूपयांनी स्वस्त झालं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १५ ऑक्टो – Gold-Silver Rate धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी आधी सोने- चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता दिवाळीत स्वस्तात सोने खरेदी (Gold Price) करता येणार आहे. नेमकी सोने-चांदीच्या दरात किती घसरण झालीय? आजचे दर काय आहेत, हे जाणून घेऊ या  .

सोन्याच्या दरात घसरण
डॉलरच्या वाढत्या निर्देशांकामुळे आणि आगामी FOMC बैठकीत यूएस फेड दरात वाढ झाल्याची अटकळ, यामुळे सोन्याच्या किमती (Gold Price) आठवड्याभरात दबावाखाली राहिल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा दर 50 हजार 280 प्रति 10 ग्रॅमवर​​बंद झाला. काल इंट्राडे ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 600 रूपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास मोडली होती. तर साप्ताहिक आधारावर, MCX सोन्याने 1 हजार 719 प्रति 10 ग्रॅम किंवा 3.30 रुपयांचा तोटा नोंदवला. स्पॉट मार्केटमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव (Gold-Silver Rate) 1.33 टक्क्यांनी घसरून 1 हजार 643 डॉलर प्रति औंस झाला.

चांदीचे दर किती?
IBJA नुसार, सराफा बाजारात गेल्या एका आठवड्यात सोने 51 हजार 120 रुपयांवरून 50 हजार 438 रुपयांपर्यंत घसरले. म्हणजेच पाच दिवसांत सोन्याचा भाव 682 रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी, आजचा चांदीचा भाव (Silver Price) एका आठवड्यात सुमारे 3 हजार 000 रुपयांनी तुटला आहे. या दरम्यान चांदीचा भाव 58 हजार 949 रुपयांवरून 56 हजार 042 रुपये किलो झाला. म्हणजेच या आठवड्यात चांदी 2 हजार 907 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *