महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १५ ऑक्टो – सणांआधीच आता पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळली आहे. अमूल कंपनीने दिल्लीत दुधाच्या दरात 5 रुपयांनी वाढ केली आहे. येथे आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा दर 63 रुपये प्रति लिटर झाला आहे. यापूर्वी अमूलने ऑगस्ट महिन्यात दुधाच्या दरात वाढ केली होती. वाढत्या खर्चाला कारणीभूत ठरले.
ही वाढ अचानकपणे झाली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने आपल्या फुल क्रीम दुधाची किंमत 2 रुपये प्रति लिटरवरून 63 रुपये प्रति लिटर केली आहे, जी पूर्वी 61 रुपये प्रति लिटर होती. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
अमूलने तिसऱ्यांदा अशाप्रकारे दरात वाढ केली आहे. कंपनीने याआधी ऑगस्ट आणि मार्चमध्ये आपल्या दुधाच्या उत्पादनाच्या किमती वाढवल्या होत्या. याआधी ऑगस्टमध्ये अमूलसह प्रमुख दूध उत्पादक आणि वितरकांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती. मदर डेअरीसारख्या दुधाच्या ब्रँडनेही अमूलच्या दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली होती.