Today Horoscope १६ ऑक्टो : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १६ ऑक्टो –

मेष (Aries):-
आज अनीतिचा मार्ग अवलंबू नका. साधा व सोपा मार्ग स्वीकारा. भौतिक विकास होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराच्या कल्पनांना मूर्त रूप द्या. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

वृषभ (Taurus ):-
आज मनातील शंका काढून टाकाव्यात. त्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. धीराने कामे करावीत.

मिथुन (Gemini ):-
आज घरात नवीन खरेदी केली जाईल. हातून काही कल्पक कार्य घडेल. कलेचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. जोडीदारासोबत उत्तम काळ व्यतीत कराल.

कर्क (Cancer ):-
आज योग्य वेळी बुद्धीचा वापर करावा. आजाराकडे दुर्लक्ष करू नका. मोठ्या अधिकार्‍यांचा हस्तक्षेप उपयोगी ठरेल. कार्यालयातील सहकारी सहकार्य करतील. भावंडांचा सल्ला मोलाचा ठरेल.

सिंह (Leo):-
आज कपटी लोक ओळखून वागा. विनाकारण खर्च होणार नाही याकडे लक्ष द्या. दिवस व्यस्त राहील. नवीन जबाबदारी खांद्यावर पडू शकते. सर्वांशी गोडीने वागाल.

कन्या (Virgo):-
आज विद्यार्थ्यांना परिश्रमाचा काळ. सोप्या वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घेऊ नका. वादाचे प्रसंग टाळावेत. हितशत्रूंपासून सावध राहावे. आपण आणि आपले काम एवढेच पहा.

तूळ (Libra):-
आज घरातील कार्य मार्गी लागतील. कामात एखाद्याचा हस्तक्षेप घ्यावा लागेल. व्यवहारासंबंधी मुद्दे मार्गी लावा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जुने वाद मिटू शकतील.

वृश्चिक (Scorpio):-
आज गुंतवणुकीसाठी योग्य काळ. पुढील पाऊल उचलताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. सकारात्मक विचार करावा. मानसिक प्रसन्नता लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन विचार घेऊन जाल.

धनू (Sagittarius):-
आज उद्योगात जोखीम पत्करून काम करावे लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पहावा. कौटुंबिक समस्या धीराने सोडवा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मकर (Capricorn):-
आज जोडीदाराच्या खुशालीसाठी खर्च कराल. भागिदारीतून लाभ मिळेल. कामात अपेक्षित परिवर्तन दिसून येईल. वादाचे प्रसंग टाळावेत. एखादी सकारात्मक वार्ता मिळेल.

कुंभ (Aquarius):-
आज कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला सुखद दिवस. नवीन ओळख होईल. वडीलांचे मार्गदर्शन घ्यावे. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

मीन (Pisces):-
आज सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्या बोलण्यात मृदुता ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. कामातील काही समस्या सुटतील. बौद्धिक चातुर्य वापरावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *