महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी आणि मोशी या भागातील आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरात आता कोरोनाबाधितांची संख्या 56 झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या पत्रकानुसार कोरोनाची लागण झालेले शहरात आतापर्यंत 121 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 52 रुग्ण उपचार घेऊन कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 2 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड शहराचे रहिवासी नाहीत. सध्या शहरात एकूण 56 रुग्ण आहेत. रविवारी शहरातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी आणि मोशी परिसरातील आहेत.