जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाख पार; तर 2 लाख 48 हजार मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – : जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा कहर जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगाची तुलना केल्यास एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 35 टक्के रुग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 88 हजार 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 68 हजार 598 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 78 हजार 263 लोक बरे झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *