महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संभाजीनगर – आनंद चौधरी – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, नाशिक पाठोपाठ संभाजीनगरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात कोरोनाचा 10 वा बळी घेतला आहे.संभाजीनगर शहरात आज सकाळी 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 291 वर पोहोचली आहे. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, मार्च महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु, अचानक एप्रिल महिन्यात मध्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली.
संभाजीनगर महापालिका प्रशासनाच्या वतीने बाधित झालेल्या भागांमध्ये दारोदार तपासणी सुरू केल्याने रोज नव्या रुग्णांची आकडेवारी समोर आली. तसंच शहरात हॉटस्पॉटही वाढत गेले.शहरात 27 एप्रिल रोजी सर्वाधिक 42 रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 28 तारखेला 24 रुग्ण, 29 तारखेला 10 आणि 30 तारखेला 22 रुग्ण आढळले. तर 1 मे रोजी सकाळी 7 आणि संध्याकाळी 32 रुग्ण आढळले. तर 2 मे रोजी 23 रुग्ण आढळले होते. तर 3 मे रोजी आणखी 38 रुग्णांची भर पडली.
आज संभाजीनगर मध्ये सकाळी आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुंडलीकनगरच्या माध्यमातून एका नव्या हॉटस्पॉटची शहरात भर पडली आहे. आज सकाळी सापडलेल्या कोरोना रुग्णांमध्ये नंदनवन कॉलनी 1, देवळाई 1, पुंडलिकनगर 2, भीमनगर 3, किलेअर्क 1, सावित्री नगर आणि चिकलठाणा 1 अशी रुग्ण संख्या आहे.