Pune : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध भागातील सहा ठिकाणी आग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाच्या सोमवारी दिवशी शहरात माेठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागातील सहा ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली.

घोरपडी येथील एका सोसायटीतील पार्किंग मध्ये फटाक्यांमुळे दुचाकींना आग लागली, त्यात आठ दुचाकी जलाल्या. सोमवारी रात्री उशीरापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या किरकोळ घटना घडल्या.

पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक ४७ येथे एका झाडाला फटाक्यांमुळे आग लागली. विश्रांतवाडीतील सिरीन हाॅस्पिटलसमोर पेटत्या फटाक्यामुळे झाडाला आग लागली. तर कात्रजमधील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकातही आग लागल्याची घटना घडली.

सोसायटीतील सदनिकेच्या गॅलरीत ठेवलेल्या साहित्यावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने हि आग लागली होती.वारजे माळवाडीत चैतन्य चोैकातील युनिव्हर्सल सोसायटीत एका बंद सदनिकेत आग लागली.

दरम्यान, रात्री साडेआठ वाजता घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर बिटाटेल एनक्लेव्ह सोसायटीत फटाक्यांमुळे आग लागली. फटाक्यांमुळे पार्किंगमधील आठ दुचाकी पेटल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घेऊन आग आटोक्यात आणली. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील ज्ञानदीप शाळेच्या छतावर पडलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला.

अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, वाहनचालक शाहनवाज सय्यद सोमवारी दुपारी वाहनातून धानोरी परिसरातून जात होते. त्यावेळी एका रिक्षाच्या सीएनजी टाकीतून गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सय्यद यांनी प्रसंगावधान राखत रिक्षात ठेवलेली फटाक्यांची पिशवी बाहेर काढली. रिक्षातून सीएनजी गळती झाल्यानंतर रिक्षाचालक आणि प्रवासी बाहेर उतरले होते. या घटनेमुळे धानोरी रस्त्यावरील काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गांगड आणि सय्यद यांनी रस्त्यातील रिक्षा रस्त्याच्या कडेला नेली. रिक्षात आग लागली नसल्याची खात्री केली.

दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी शहरात फटाक्यांमुळे एकापाठोपाठ आग लागण्याच्या घटना घडल्याने जवांनाची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान सहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *