Bank Holidays November 2022 : नोव्हेंबरमध्ये बँकेची काम प्लॅन करताना आधी ‘हे’ वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । नोव्हेंबर महिना सुरू होण्यासाठी थोडेच दिवस उरले आहेत. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की पहा .

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत.आरबीआयने सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.

यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत.

नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत

१ नोव्हेंबर २०२२ – कन्नड राज्योत्सव/कुट – बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद

६ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

८ नोव्हेंबर २०२२ – गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव – आगरतळा, बंगलोर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम वगळता बँका बंद

११ नोव्हेंबर २०२२ – कनकदास जयंती / वांगला उत्सव – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद

१२ नोव्हेंबर २०२२ – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

हेही वाचा: Banking : सरकारी बँकांसाठी आता एकच हेल्पलाइन; ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण

१३ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

२० नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

२३ नोव्हेंबर २०२२ – सेंग कुत्सानेम- शिलॉन्ग येथे बँक बंद

२६ नोव्हेंबर २०२२ – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

२७ नोव्हेंबर २०२२ – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *