महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. त्यांच्या या वादाग्रस्त विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना २४ तासांचा अल्टीमेट दिला आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यातून टीकेची झोड पाहता सत्तार यांनी माघार घेतल्याचेही स्पष्ट केलं. (Abdul Sattar reaction Supriya Sule controversial statement maharashtra politics )
सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. सत्तारांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी महिला संघाने मोर्चा काढला. त्यानंतर पुन्हा सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन माघार घेतली. सॉरी बोलो आहे. महिलांबद्दल माझा बोलण्याचा उल्लेख नाही. माझ्या पक्षाची नीतीदेखील नाही. महिलांची मनं दुखावली असतील तर मी माझा शब्द मागे घेतो. ५० खोके म्हणून बदनाम करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे उत्तर होतं. अस त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं.
काय म्हणाले सत्तार?
काही तासापूर्वी, माझा कोणीही निषेध केला तर मी कुणाला घाबरत नाही. जे आम्हाला खोक्याची भाषा बोलतात त्यांच डोकं तपासाव लागेल. आम्हाला त्यांच्यासारखी सवय नाही.
मी आताही बोलणार नंतरही बोलणार आणि सभेतही बोलणार. कोण टीक करत असले तर टीका ही करावी लागणारच ना असा संतप्त होत त्यांनी सवालदेखील केला. लोकशाही आहे. तस आमच्या पुढाऱ्यांच कामचं आहे.
तो शब्द तुम्हाला वावगा वाटत नाही का असं विचारलं असता. ते म्हणाले, मला शब्द कोणताही वावगा वाटत नाही. महिला असेल तर मी त्यांचा सन्मान करतो. मी आमच्यावर ज्या प्रकारे टीका केली जाईल त्याच प्रकारे त्यांना उत्तर दिले जाईल.
आम्ही खोके घेतलेत त्यांनी त्याचा पुरावा द्यायला हवा. मी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे. असे स्पष्ट सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केले होते.
मात्र, टीकेची झोड उठताच त्यांनी वादग्रस्त वक्तव्यावरुन माघार घेतले असल्याचे स्पष्ट केले.