महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. बुधवारी (ता.६) आणखी २८ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण बाधीत संख्या ३४९ वर गेली आहे. असे जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरातील जयभीम नगर ५, कबाडपुरा ५, दत्तनगर ४, संजय नगर ३, इंद्रप्रस्थ कॉलनी १, पुंडलीकनगर ३, बेगमपुरा १, हाक टॉवर १, सतारा रोड १, बायजीपुरा ४ या भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.